‘वाचनरंग’ च्या पुनरागमनाच्या निमित्ताने,

 प्रिय वाचक...

भारतीय परंपरेत पहिला लेखनिक कोण तर गणराय. अर्थातच महामुनी व्यासांनी जे महाभारत लिहिले त्याचे लेखन साक्षात गणरायाने म्हणजेच गणेश या दैवताने केले असे सांगितले जाते. म्हणजेच गणेशचतुर्थी हा दिवस एखाद्या लेखनाचा प्रारंभ करण्यासाठी किती योग्य मुहूर्त आहे. मुळात काही वर्षापूर्वी आंतरजालात आपण लेखन करावे ही कल्पना सुचल्यावर ती प्रत्यक्षात आली ती मित्र अभिजित सोनावणे याच्यामुळे. त्याने अत्यंत स्नेहपूर्वक माझे लेख ‘वाचनरंग’ या ब्लॉगवर अपलोड करून दिले. पुढे विविध कामांच्या धबडग्यात आणि या माध्यमांबद्दल फारशी आपुलकी वाटत नसल्याने, त्यात सातत्य राहिले नाही. पुढे आंतरजालाच्या विविध नियमांमुळे तो ब्लॉग अल्पजीवी ठरला. गेले काही महिने ब्लॉग लेखन पुन्हा एकदा सुरू करायचे मनात होते. त्याला चालना मिळाली विविध मित्रांमुळे. मग अखेर ‘वाचनरंग’ या ब्लॉगची गणरायाच्या या उत्सवी काळात पुन्हा सुरवात करायचे ठरवले. आता दररोज नाही तरी दर सप्ताहाला नक्की भेटू. 


जय गणेश, जय गणेश  


प्रकाशकांनी आपली पुस्तके आमच्याकडे जरूर पाठवावीत. त्याचे रसग्रहण नक्की केले जाईल....


                     पुस्तकांशी मैत्री अर्थातच उन्नयनाची खात्री...

Comments

Popular posts from this blog

मराठी माणसाच्या अविनाशी उद्योग संस्कृतीचा स्वाभिमान बिंदू