Posts

‘वाचनरंग’ च्या पुनरागमनाच्या निमित्ताने,

 प्रिय वाचक... भारतीय परंपरेत पहिला लेखनिक कोण तर गणराय. अर्थातच महामुनी व्यासांनी जे महाभारत लिहिले त्याचे लेखन साक्षात गणरायाने म्हणजेच गणेश या दैवताने केले असे सांगितले जाते. म्हणजेच गणेशचतुर्थी हा दिवस एखाद्या लेखनाचा प्रारंभ करण्यासाठी किती योग्य मुहूर्त आहे. मुळात काही वर्षापूर्वी आंतरजालात आपण लेखन करावे ही कल्पना सुचल्यावर ती प्रत्यक्षात आली ती मित्र अभिजित सोनावणे याच्यामुळे. त्याने अत्यंत स्नेहपूर्वक माझे लेख ‘वाचनरंग’ या ब्लॉगवर अपलोड करून दिले. पुढे विविध कामांच्या धबडग्यात आणि या माध्यमांबद्दल फारशी आपुलकी वाटत नसल्याने, त्यात सातत्य राहिले नाही. पुढे आंतरजालाच्या विविध नियमांमुळे तो ब्लॉग अल्पजीवी ठरला. गेले काही महिने ब्लॉग लेखन पुन्हा एकदा सुरू करायचे मनात होते. त्याला चालना मिळाली विविध मित्रांमुळे. मग अखेर ‘वाचनरंग’ या ब्लॉगची गणरायाच्या या उत्सवी काळात पुन्हा सुरवात करायचे ठरवले. आता दररोज नाही तरी दर सप्ताहाला नक्की भेटू.  जय गणेश, जय गणेश   प्रकाशकांनी आपली पुस्तके आमच्याकडे जरूर पाठवावीत. त्याचे रसग्रहण नक्की केले जाईल....       ...

मराठी माणसाच्या अविनाशी उद्योग संस्कृतीचा स्वाभिमान बिंदू

Image
मराठी माणसाच्या  अविनाशी उद्योग संस्कृतीचा स्वाभिमान बिंदू नोकरी आणि मराठी माणूस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मराठी माणूस उद्योगधंद्यात फारसा पडत नाही. आता या वाक्यातच इतकी गंमत आहे, की प्रत्येक वेळा आपण ‘पडत नाही’ असं म्हणतो. उद्योगधंद्यात उतरत नाही, शिरत नाही असं का आपण म्हणत नाही. कारण मराठी माणूस आणि उद्योग याचं प्रमाणच उलटं अर्थातच न जुळणार असं आहे. मराठी माणसानं पिढ्यान् पिढ्या उद्योग केला आहे, असं फारसं घडत नाही. एखाद्या पिढीनं उद्योग केला की दुसरी पिढी तो राखते, तिसऱ्या पिढीत टिकेल का नाही याची खात्री देता येत नाही. मराठी माणसाचे उद्योग म्हटलं, की किर्लोस्कर, डहाणूकर, गरवारे, पारखे, ओगले... अजून दोन-चार नावं घेतली की ही यादी थांबली जाते. पण मराठी माणसानं पिढ्यांनपिढ्या धंदा केला आहे, अशी उदाहरणं खूप कमी आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ वर्तमानपत्र आणि संपूर्ण उद्योगसमूह आणि त्याचे प्रमुख ‘पीजीपी’ अर्थात प्रताप गोविंदराव पवार यांचं उदाहरण वेगळंच मानावं लागेल. मुळात त्यांचा उद्योग हा कन्स्ट्रक्शन किंवा सोने-चांदी किंवा एखादा साखर कारखाना असं नाही. तर बुद्धीशी संबंधित...